Google Ad
Uncategorized

सांगवीतील रेवा क्लिनिक चे डॉ.अनिल आणि डॉ.शिल्पा पाटील यांना पुत्रशोक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जुलै) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे एक मन हेलावून टाकणारी घटना घडली, सांगवीतील रेवा क्लिनिक चे डॉ.अनिल आणि शिल्पा पाटील यांचा अवघ्या १९ वर्षाचा चिरंजीव कु. शोन याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात दुःखद निधन झाले आणि सर्व सांगवी परिसर हळूहळून गेला.

आज सोमवार दिनांक १० जुलै रोजी , सांगवी येथील डॉ अनिल जीवन पाटील मुळगाव फेस ह.मु.सांगवी पुणे यांचा मुलगा कु.शोन वय वर्ष १९ याच दुःखद निधन झाले आहे. शोन याच्यावर सांगवी येथील स्मशानभूमीत मंगळवार दिनांक ११ जुलै रोजी दुपारी १२.०० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे, असे त्यांच्या परिवाराकडून कळविण्यात आले आहे.

Google Ad

याच वर्षी १२ वी सायन्स नीट (NEET) ची परीक्षा चांगल्या गुणांनी ‘शोन‘ उत्तीर्ण झाला होता. त्याला डॉक्टर व्हायचे होते, त्याच्या डॉक्टर असणाऱ्या आई वडिलांचेही ते स्वप्न होते. परंतु नियतीने त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे ठेवले. परिसरात सर्वांचा आवडता, अतिशय अभ्यासु- हुशार , मनमिळाऊ असणाऱ्या ‘शोन’ याच्या निधनाची बातमी सांगवी- नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यावर प्रेम करणारे त्याचे असंख्य मित्र नातेवाईक यांना अश्रु अनावर झाले, त्याच्या या निधनाने सांगवी परिसरात शोककळा पसरली , ‘शोन’ च्या आत्म्यास ‘ईश्वर चिरशांती देवो’ ही सर्वांच्या वतीने “भावपूर्ण श्रद्धांजली” …!!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!