Google Ad
Editor Choice

आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल बोपखेल येथील महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकांचा आयुक्त यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज,दि. १०जून २०२२:- आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल बोपखेल येथील महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकांचा आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उप आयुक्त संदीप खोत, चंद्रकांत इंदलकर, रविकिरण घोडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, यांच्यासह आकांक्षा फॉंडेशनचे सुषमा पठारे, डॉनी बिजू, निखील एकबोटे, बोपखेल येथील शाळेचे शिक्षक आणि आकांक्षा फॉंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

महापालिकेच्या बोपखेल येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे नाव जगातील सर्वोत्तम शाळांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या नामांकन यादीत “समुदाय सहयोग” community collaboration या श्रेणीअंतर्गत पहिल्या दहा मध्ये निवड झाली आहे. असा पुरस्कार मिळवणारी राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहिली शाळा ठरली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आकांक्षा फॉंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण दिले जाते. या पुरस्काराबद्दल आयुक्त पाटील यांनी शाळेचे तसेच आकांक्षा फॉंडेशनचे कौतुक केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!