Google Ad
Editor Choice

पुण्यातील महाविद्यालये सोमवारी नव्हे तर मंगळवारी सुरु होणार, महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदमुळे निर्णय

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ऑक्टोबर) : पुण्यात येत्या सोमवारपासून महाविद्यालये सुरु होणार होती. मात्र, आता प्रशासनाने हा निर्णय एक दिवसाच्या लांबवणीवर टाकला आहे. आता महाविद्यालये सोमवारऐवजी मंगळवारी सुरु होणार आहेत. महविकास आगाडीने सोमवारी पुकारलेल्या बंदमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या घोषणेनंतर सर्व महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या स्वागतच्या तयारीला लागले होते. मात्र, आता पुण्यातील महाविद्यालये सोमवार ऐवजी मंगळवारी सुरु होणार आहेत. तशी माहिती प्रशानाकडून देण्यात आली आहे. सोमवारी माहविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांनी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकऱ्यांना कारने चिरडल्याच्या घटनेविरोधात बंद पुकारला आहे. सोमवारी संपूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असतील. याच कारणामुळे महाविद्यालये एका दिवसाने उशिराने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

294 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!