भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प..
सांगवी काळेवाडी मंडलच्या “माझी माती माझा देश” कार्यक्रमात नागरिकांची सामुहिक पंचप्रण शपथ..
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०३ ऑक्टोबर २०२३) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “मेरी माटी मेरा देश” अर्थात “माझी माती माझा देश” आणि ”मातीला नमन, वीरांना वंदन” हा उपक्रम देशभर राबवला जात आहे. भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभेतील सांगवी काळेवाडी मंडलच्या वतीने नुकताच हा कार्यक्रम पिंपळे सौदागर येथील स्व. बाळासाहेब कुंजीर क्रिडांगण येथे संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी भाजपा चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, डॉ. प्रा. सी ओ बडगुजर, ऑल सिनियर सिटिझन असोसिएशन अध्यक्ष इंजि विलास जोशी, सचिव डॉ सुभाषचंद्र पवार, उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी कोषाध्यक्ष श्री विवेकानंद लिगाडे, रमेश चांडगे, जयपाल सिदणाळे, दिलीप चौगुले, बछराज शर्मा, उमेश धूत, शकुंतला शिंदे, माजी नगरसेवक संदीप नखाते व सर्व सभासद प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर्स, गायक, वादक कलावंत आणि बुथ क्रमांक ३०१ चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान उपस्थितांनी “भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणा-यांप्रती सन्मान बाळगू, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू तसेच देशाचे नागरिक म्हणून आम्ही सर्व कर्तव्यांचे पालन करू ” अशी सामुहिक पंचप्रण शपथ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ घेतली.
यावेळी ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी वेबसाईटवर जाऊन अथवा QR कोड स्कॅन करून हातामध्ये माती घेऊन काढलेला सेल्फी अपलोड करावा, असे आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…