Google Ad
Editor Choice Education Pune District

कोचींग क्लासेस असोसिएशनने पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना १४ महिन्यापासून बंद असलेले कोचिंग क्लासेस पुन्हा सुरू करण्यासाठी दिले निवेदन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि१० जून) : कोचींग क्लासेस असोसिएशन पुणे पिंपरी-चिंचवड कडून पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना 14 महिन्यापासून बंद असलेले कोचिंग क्लासेस पुन्हा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये आपण सरकार तर्फे तुम्ही क्लासेस सुरू करण्यासाठी जी नियमावली द्याल त्या नियमावलीनुसार आम्ही क्लासेस सुरू करू द्यावे अशी मागणी करण्यात आली. कारण गेल्या चौदा महिन्यापासून कोचिंग क्लास वाल्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. यामुळे कोचिंग क्लासेस वाल्यांचे अत्यंत हाल होत आहेत अनेकांना त्यांचा व्यवसाय बदलावा लागला तर अनेकांना भाजीपाला विक्री सारखे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करावे लागत आहे.

क्लासेस बंद असल्यामुळे शिक्षकांचे पगार,क्लास चे भाडे,लाईट बिल, घर भाडे, बँकेचे हफ्ते, घर खर्च , आम्हाला बँका कोणत्या प्रकारचे अर्थसहाय्य करायला तयार नाही. तर सरकारने या सर्व गोष्टींची दखल घेऊन लवकरात लवकर कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी. असे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले की परवा होणाऱ्या पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपला विषय मांडला जाईल आणि त्याच्यावर योग्य तोडगा काढला जाईल,असे सांगण्यात आले.असोसिएशन तर्फे त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना देण्यात आली.

Google Ad

निवेदन देताना कोचिंग क्लासेस असोसिएशन कडून राज्य उपाध्यक्ष प्रा. उमेश बोरसे, यशराज चव्हाण, प्रशांत ढाकणे सर, गणेश ढाकणे सर, रामेश्वर जगले सर, अशोक धुळेधुळे सर दत्तात्रेय काटे सर, पांडुरंग फुंदे सर, गणेश गव्हाणे सर, संतोष साळुंके सर, कौशल बंडेवार सर, पाटील सर, रामकृष्ण पद्माने सर, धनाजी टेडे सर, गोरख जाधव सर, दत्तात्रय मोहिते सर, नवनाथ शेटे सर, तुकाराम टिपले सर, गणेश चोपडे सर, दिलीप इंद्रले सर, सिद्धेश्वर पाटील सर, गणेश मोहिते सर, मयुरी चेडे.इत्यादी संचालक उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!