Google Ad
Editor Choice

सर्वसामान्यांना मोठा झटका : नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ … महागणार CNG गॅस!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑक्टोबर) : पेट्रोल आणि डिझेलच्या पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमती देखील वाढवण्यात आल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दोनच दिवसांपूर्वी वाढवल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला आहे.

यानुसार, सीएनजीच्या किंमती तब्बल ६२ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. हाच नैसर्गिक वायू सीएनजी इंधन बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम सामान्यांच्या खिशावर आणि त्यांच्या आर्थिक गणितांवर पडण्याची शक्यता आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबर अर्थात आजपासूनच पुढच्या ६ महिन्यांसाठी लागू होणार आहे. नैसर्गिक वायूचे उत्पादन करणाऱ्या ओएनजीसीसारख्या कंपन्यांमध्ये ही दरवाढ तातडीने लागू करण्यात आली आहे.

Google Ad

केंद्राने जाहीर केलेल्या दरवाढीनुसार, १ ऑक्टोबरपासून कठीण तेल क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूचे दर प्रति दशलक्ष ब्रिटीश थर्मल युनिटसाठी (BTU) २.९० डॉलर एवढे असणार आहेत. हा नैसर्गिक वायू प्रामुख्याने सीएनजी आणि मोठ्या शहरांमध्ये पाईपद्वारे पुरवण्यात येणाऱ्या घरगुती गॅसच्या निर्मितीमध्ये वापरला जातो. त्यामुळे नैसर्गिक वायू दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पाईपने पुरवल्या जाणाऱ्या घरगुती गॅसच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक वायूच्या किमतीतील वाढीमुळे सीएनजी, तसेच मुंबई व दिल्लीसारख्या शहरांमधील पाइपने मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत १० ते ११ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, यामुळे वीजनिर्मितीच्या खर्चातही वाढ होईल, पण वायूपासून तयार होणाऱ्या विजेचे प्रमाण अतिशय कमी असल्याने ग्राहकांना त्याची फारशी झळ पोहोचणार नाही.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!