Google Ad
Uncategorized

स्वच्छतेमुळेच पेशंट बरे होण्यास मदत होते – नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी (दि. ३) सकाळी दहा वाजता भेट दिली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत प्रथमत: स्वच्छतेची पाहणी करताना दिसून आले. पाहणी दरम्यान त्यांनी जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेचे विशेष कौतुकही याप्रसंगी केले.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, अनेकदा रुग्णालयात येणारे रुग्ण अस्वच्छतेमुळे बरे होत नाहीत. मात्र या जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण येथील स्वच्छतेमुळे नक्कीच त्वरित बरे होत असतील असे वाटते. स्वच्छता ही रुग्णांच्या उपचारांचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.

Google Ad

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले, उपसंचालक डॉ राधाकिशन पवार, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. क्रांती राऊत यांच्यासह रुग्णालयातील विविध विभागातील वरिष्ठ डॉक्टर्स यांच्या समवेत रुग्णालयाबाबत माहिती जाणून घेतली. रुग्णालयातील स्वच्छता, औषधांची उपलब्धता, आणि उपचारांची सुसज्जता याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विभागीय अडचणींवर त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले. रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांच्या संख्येची याबाबत चर्चेमध्ये माहिती घेतली.

रुग्णालयात सुसज्जता आणि कर्मचारी कार्यक्षमता याचे कौतुक करताना, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींवर भर दिला. त्यांनी सांगितले की, “सिटी स्कॅन आणि एम.आर.आय. यांसारख्या येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होणे अपेक्षित आहे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
रुग्णालयात महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधांची उपलब्धता जास्तीत जास्त रुग्णांना मिळणे अत्यावश्यक आहे.” यासाठी जिल्हा अधिकारी यांनी सांगितलेल्या तरतुदी पूर्ण करण्यास प्रयत्नशील असणार आहे. असे आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिले.

रुग्णालयातील औषधांची उपलब्धता नियमित ठेवण्याचे आणि रुग्णांच्या आजाराबाबतची काळजी घेण्यासंबंधी अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले. भेटी दरम्यान प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयातील संबंधित अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, रुग्ण, नातेवाईक यांच्याशी संवाद साधला आणि रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी ते म्हणाले, “आम्ही रुग्णांच्या आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्नशील आहोत. सर्व विभागातील डॉक्टर्स, कर्मचारी यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.”adयावेळी संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, कुष्ठरोग उपसंचालक डॉ. संदीप सांगळे, कुटुंब कल्याण उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र प्रा. डॉ. सुहास कोरे, डॉ. वंदना जोशी, डॉ. वर्षा डोईफोडे, डॉ. अनिल संतपुरे, डॉ. रेखा पेटकर, डॉ. कविता कोरे, डॉ. उर्मिला मुंढे, रुग्ण कल्याण समितीचे डॉ. देविदास शेलार, डॉ. राजेश थोरात आदी उपस्थित होते.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा रुग्णालयातील तातडीचा वैद्यकीय विभाग, डायलिसिस विभाग, बालरोग विभाग, अति दक्षता विभाग, अस्थीरोग विभाग, मेट्रो ब्लड बँक, एम आर आय – सी टी स्कॅन विभाग, एन सी आर टी विभाग, औषधे विभाग तसेच उपहारगृहाला आवर्जून भेट देऊन पाहणी केली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!