Categories: Editor Choice

साफसफाई कामगारांचा ११०००/-पगारचा १६०००/- करून दिला … कर्मचाऱ्यांनी सांगवीत नातच आनंद व्यक्त केला….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव मधिल प्रभागातील सर्व कंत्राटी साफसफाई कर्मचाऱ्यांना १६००० पगार मिळवून देण्यात मनसेने घेतलेल्या भूमिकेला यश आले.

मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेकडून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नवी सांगवी व जुनी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये दोन दिवसापूर्वी बैठक घेण्यात आली, बैठक घेवून मनसे त्यांचे प्रश्न सोडवेल, आणि गरज लागल्यास मनसेची ताकद दाखवून देवू असे आश्वासन दिले होते आणि पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांकडे या करिता पाठपुरावा केला होता.

कामगारांकडून आलेल्या प्रश्नांवर काम करून, आयुक्तांना निवेदन देऊन कामगारांचे पगार वाढवून घेतले. त्याबद्दल कामगारांनी सर्वांचे सत्कार घेतले व आभार मानले व आनंद व्यक्त केला. काही कर्मचाऱ्यांनी तर तेथेच आनंद व्यक्त करत गाण्याच्या तालावर डान्स ही केला, कारण त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. आता त्यांना कामाप्रमाणे दाम मिळणार होते, त्याचाच हा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

यावेळेस, मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेना पिंपरी-चिंचवड शहर, अध्यक्ष मा. श्री. रूपेश भाऊ पटेकर., शहर उपाध्यक्ष मा.श्री राजू (भाऊ) सावळे, महिला शहर सचिव सौ. सीमाताई बेलापुरकर, सुरेश सकट मंगेश भालेकर, निलेश नन्नवरे, भरत क्षेत्रे, दौलत आटपाडकर, पप्पु शिंदे, प्रफुल्ल कसबे, किसन हांडे, साईराज भोसले,तसेच सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 hour ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

9 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago