चतुर्थ श्रेणीतील कर्मचा – यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा … संजोग वाघेरे पाटील यांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०जुलै) : पिंपरी चिंचवड महापालिकेतील शासनाच्या अध्यादेशानुसार लाड व पागे कमिटीच्या शिफारशीनुसार चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचा-यांची वारस हक्क नेमणूक केली जाणार आहे. मात्र, यामध्ये खुल्या व ओबीसी प्रवर्गातील कर्मचा-यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी मांडली आहे.

संजोग वाघेरे पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आज मंगळवार रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या अध्यादेशानुसार लाड व पागे कमिटीच्या शिफारशीनुसार चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांची वारस हक्क नेमणूक करण्याचा निर्णय झाला आहे. याची अंमलबजावणी करत असताना आतापर्यंत ज्या वारस हक्काने राजीनामा दिला आहे. तसेच, राजीनामा देऊ इच्छिणाऱ्या सर्व चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचा-यांनी आपल्या वारसाच्या नेमणुकीबाबत शिफारस केलेली आहे. या लोकांच्या बाबतीत योग्य निर्णय सहानुभूतीपूर्वक करण्याची विनंती निवेदनात केली आहे.

चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचा-यांसाठी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. अनेक कुटुंबांचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे. यापूर्वी असंख्य कर्मचा-यांची नेमणूक या वारस हक्काप्रमाणे झालेली आहे. सद्यस्थितीत शिफारस केलेल्या कर्मचा-यांचा वारसांचा विचार होणे गरजेचे आहे. त्यांना प्रशासनाने नेमणूक करून न्याय द्यावा, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटलेले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

8 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

15 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago