Google Ad
Editor Choice

दिवाणी व फौजदारी न्यायालय मोरवाडी पिंपरी येथील बार असोसिएशनला … आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या निधीतून संगणक व प्रिंटर प्रदान!

 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९सप्टेंबर) : दिवाणी व फौजदारी न्यायालय मोरवाडी पिंपरी येथील बार असोसिएशनला आमदार जगताप लक्ष्मण पांडुरंग यांच्या निधीतून संगणक व प्रिंटर प्रदान करण्याचा कार्यक्रम आज ९ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजता पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम प्रसंगी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप आणि मा. सभापती स्थायी समिती पिं.चिं.मनपा श्री. विलास हनुमंत मडीगेरी उपस्थित होते.

Google Ad

सदर प्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील वकिलांकरिता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने मोशी येथील नियोजित कोर्टाच्या इमारतीकरता आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासित करताना वकील या शब्दातील व म्हणजे वकृत्व, क म्हणजे कर्तुत्व आणि ल म्हणजे लौकिक याप्रमाणे पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व वकील न्यायदानाच्या कामात आपले योगदान देत आहेत.

पिंपरी चिंचवड येथील बार असोसिएशन च्या नव्याने मनपाच्या नेहरूनगर येथील न्यायालयात बार असोसिएशचे सुसज्ज कार्यालयकरिता मदत करण्याचे जाहीर केले,
पिंपरी चिंचवड बार असोसिएशनला माझ्या आमदार निधी मधून ५० हजार रुपयाचा निधी ग्रंथालयकरिता पुस्तके देण्याकरिता प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे केला होता, परंतु पुस्तकांची बार असोसिएशनकडून निवड करून मंजुरी अद्यापही न मिळाल्याची माहिती देताना तातडीने सदर पुस्तकेची यादीसह प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयास पाठविण्याची आग्रहाची विनंती केली.

सदर प्रसंगी आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या वतीने अॅडव्होकेट जया उभे  यांनी 76 विविध प्रकारचे शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्याबद्दल व लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेबद्दल शाल व मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संपूर्ण करोना प्रादुर्भावच्या काळात अनेक मृतदेह  रुग्णालयातून स्मशानभूमी पर्यंत पोहोचवण्या करिता अहोरात्र सेवा करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव महिला रुग्णवाहिका चालक अनिता गोसावी यांचाही शाल व मान चिन्ह देऊन विशेष सत्कार सदर प्रसंगी करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना  पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट गोरक्षनाथ झोळ यांनी आपले विचार मांडताना आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे पिं.चिं.मनपाच्या हद्दीतील मोशी येथील न्यायालयाच्या नियोजित इमारतीकरिता निधीची मागणी विधी व न्याय राज्य मंत्री आदिती ठाकरे यांच्याकडून मान्य करून घेतल्याचे सांगताना आमदार जगताप यांनी नेहरूनगर येथील मनपाच्या जागा दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी न्यायालयाला उपलब्ध करून देणेबाबत केलेल्या प्रयत्नांबाबत आभार व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अॅडव्होकेट अतीश लांडगे यांनी प्रथमच बार असोसिएशनला संगणक व प्रिंटर उपलब्ध करून दिल्याबाबत आमदारलक्ष्मण जगताप यांचे आभार मानताना याचा लाभ आम्हा वकिलांना उच्च न्यायालयाचे व सुप्रीम कोर्टाचे अनेक निवाडे व निर्णय तत्पर संगणाकावर उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच  बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट सुशील मंचरकर यांनी मागील वीस वर्षात आमदार लक्ष्मण जगताप यांनी वेळोवेळी शहरातील वकिलांच्या विविध मागण्यांकरिता यशस्वी पाठपुरावा व मदत केल्याचे आवर्जून सांगितले व  पिंपरी चिंचवड न्यायालयकरिता नाममात्र एक रुपया दराने जागा उपलब्ध करून देण्याकरिता केलेल्या कार्याची आठवण करून देताना आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी वेळोवेळी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनला केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर बार असोसिएशनचे पदाधिकारी व पिंपरी चिंचवड दिवाणी व फौजदारी न्यायालयातील वकील उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

69 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!