Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील मैदाने, उद्याने आणि जलतरण तलाव उद्यापासून काही अटींवर खुली..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २४ जानेवारी २०२२) : पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने पालिका आयुक्तांनी शहरात निर्बंध लागू केले आहेत. सोमवारी (दि.२४ जानेवारी) रोजी आयुक्त राजेश पाटील यांनी काहीसे निर्बंध आदेशान्वये शिथिल केले आहेत.

आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जलतरण तलाव फक्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होणा-या खेळाडू व प्रशिक्षक यांच्या सरावासाठी खुली केली आहेत. सर्व उद्याने सकाळी ०६.०० ते ० ९.०० यावेळेत सुरु राहतील. शिवाय खुली मैदानेही सुरु राहतील.

Google Ad

आस्थापनांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण, सॅनिटायझेशन याबाबतच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६०, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!