महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० सप्टेंबर) : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला आवाहन केलेले आहे. १ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये ‘एक तास स्वच्छतेसाठी’ उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये नागरी सहभागातून कचरा संकलनाच्या व्यापक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या नियोजन आणि व्यवस्थापनाबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी आज विविध विभागांसमवेत आढावा बैठक घेतली. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे पार पडली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, उप आयुक्त अजय चारठाणकर, सह शहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शीतल वाकडे, उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, विजयकुमार काळे, नितीन निंबाळकर, राजेंद्र शिंदे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्यासह सहाय्यक आरोग्य अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
नवी सांगवी येथे असणाऱ्या औंध जिल्हा रुग्णालयात रविवारी ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हे अभियान राबविण्यात येणार आहे, तरी प्रभागातील नागरिकांनी आपला सहभाग ‘एक तास स्वच्छतेसाठी’ उपक्रम राबविला जाणार आहे, त्यासाठी ध्यावा, यामध्ये नागरी सहभागातून कचरा संकलनाच्या व्यापक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…