Google Ad
Uncategorized

एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे – पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांचे आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० सप्टेंबर) : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला आवाहन केलेले आहे. १ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये ‘एक तास स्वच्छतेसाठी’ उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये नागरी सहभागातून कचरा संकलनाच्या व्यापक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या नियोजन आणि व्यवस्थापनाबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी आज विविध विभागांसमवेत आढावा बैठक घेतली. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे पार पडली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, उप आयुक्त अजय चारठाणकर, सह शहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शीतल वाकडे, उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, विजयकुमार काळे, नितीन निंबाळकर, राजेंद्र शिंदे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्यासह सहाय्यक आरोग्य अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

नवी सांगवी येथे असणाऱ्या औंध जिल्हा रुग्णालयात  रविवारी ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हे अभियान राबविण्यात येणार आहे, तरी प्रभागातील नागरिकांनी आपला सहभाग ‘एक तास स्वच्छतेसाठी’ उपक्रम राबविला जाणार आहे, त्यासाठी ध्यावा, यामध्ये नागरी सहभागातून कचरा संकलनाच्या व्यापक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात येणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!