महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ सप्टेंबर) मेट्रोचा प्रवास आता केवळ ‘जॉय राइड’ न राहता तो पुणेकरांच्या दैनंदिनीचा भाग होत आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील नागरिकांनी मेट्रोला पसंती दिल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात केवळ पीसीएमसी (पिंपरी-चिंचवड महापालिका भवन) या एकाच स्थानकावर तब्बल दोन लाख तीन प्रवाशांची नोंद झाली आहे. म्हणजेच या स्थानकावरून दिवसाला सरासरी सहा हजार ४५१ जणांनी प्रवास केला आहे. आगामी काळात स्वारगेट आणि रामनगरपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर आणखी प्रवासी संख्या वाढेल, अशी स्थिती आहे.
पीसीएमसी ते पुण्यातील सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत मेट्रो आहे. तेथून मार्ग बदलून कोथरूड, वनाज आणि पुणे स्टेशन, रुबी हॉल क्लिनिकपर्यंत मेट्रोने जाता येत आहे. याच मार्गाने पुढे नगर रस्त्यावरील रामवाडीपर्यंत जाता येणार आहे. तसेच, सिव्हिल कोर्ट स्थानकापासून स्वारगेटपर्यंतच्या भूमिगत मेट्रो मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे.मेट्रो मार्गांचे दोन टप्प्यात उद्घाटन झाले. त्यावेळी ‘प्रवासी मिळणार नाहीत, उद्घाटनाची घाई कशाला. केवळ राजकीय श्रेयवादासाठी उद्घाटन केले जात आहे,’ अशी टीका झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यांतील प्रवाशांचा प्रतिसाद पाहता मेट्रोचा प्रवास आरामदायी व कमी खर्चिक असल्याचे प्रवासी सांगतात.
मी लोहगावला राहतो. पिंपरीत कामाला आहे. पूर्वी दुचाकीने खडकीमार्गे किंवा दिघी-भोसरीमार्गे येत होतो. आता लोहगावहून पुणे स्टेशनपर्यंत पीएमपीने येतो. तिथून मेट्रोने सिव्हिल कोर्ट स्थानक आणि तेथून गाडी बदलून पिंपरीत येतो. घरी परत जाण्याचा मार्गही तोच आहे. दुचाकीने येताना भीती वाटत होती. आता सुरक्षित आणि आरामशीर प्रवास होतो. असे प्रवाशाने सांगितले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…