Google Ad
Uncategorized

जुनी सांगवी येथील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त ! सामाजिक कार्यकर्ते गणेश ढोरे आंदोलनाच्या पावित्र्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ एप्रिल) : राज्यात स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक असलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या कामाने आणि कर्तृत्वाने जगाच्या पाठीवर स्मार्ट सिटी म्हणून प्रसिद्ध झाली, त्याला कारण म्हणजे येथील जनता आणि पालिकेचे कामकाज होय, परंतु अशाच पालिकेला काही अधिकाऱ्यांच्या कामचुकार पणामुळे  जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची घटना जूनी सांगवी येथील मधूबन भागात घडली.

मधुबन, सांगवी येथे गेली दिड वर्षांपासून पालिकेतर्फे कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी देखील केल्या, त्याचा आज उच्याक पाहायला मिळाला, येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश ढोरे सातत्याने समस्या सोडविण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करत होते. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी तशी निवेदन देखील दिली. अधिकाऱ्यांनी त्यांना मधुबन येथील पाणीसमस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले होते. परंतु तसे घडले नाही, आणि नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Google Ad

नुकतेच गणेश ढोरे याांांनी नव्याने एक निवेदन दिले आणि  दुसर्‍याच दिवशी पाणी पुरवठा विभागाने धडक कारवाई करून नागरिकांच्या घरांमधून मोटर पंप जप्तीची कारवाई केली. आधीच अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्या मुळे येथील रहिवासी पाणीटंचाई मुळे त्रस्त असताना पालिकेच्या या धडक कारवाई मुळे नागरिक अधिकच संतप्त झाले असल्याचे दिसून आले. या भागात काम करणारे महानगरपालिकेेेचे अधिकारी काम करत नसल्याचे व ते केव्हााही जागेवर भेटत नसल्याचे नागरिकांंचे म्हणणे आहे, तसेच तक्रार दिली तरच कारवाई केली जाते, आणि नागरिकांनी शेजारीपाजारील लोकांंची मोटर लावतात म्हणून तक्रार करावी मग आम्ही कारवाई करू… असे अधिकाााऱ्याचे म्हणणे असते, म्हणजे वाईटपणा नागरिकांनी घ्यायचा, मग हे अधिकारी आणि कामगार महानगरपालिका  कशासाठी पोसते असा सवाल नागरिक करत आहेत. वरिष्ठ अधिकारी याांांनी या गोोोष्टीकडे लक्ष देेेने गरजेचे आहे. यावेळी पाणीपुरवठा वरिष्ठ अभियंता चंद्रकांत मोरे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल आणि नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

सर्वाना समान पाणीपुरवठा करणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे, त्यांनी भेदभाव केला नाही पाहिजे, मग नागरिक मोटर लावणार नाहीत असे मत यावेळी अनेक नागरिकांनी व्यक्त केले. या धडक कारवाई चा आणि अधिकाााााऱ्याचा  सामाजिक कार्यकर्ते गणेश ढोरे यांनी तीव्र व संतप्त शब्दांत निषेध केला असून हा प्रश्न लवकर न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!