Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या जनसंवाद सभेची वेळ संपल्यानंतरही ‘ह’ प्रभाग कार्यालयात नागरिकांनी तक्रार देण्यासाठी गर्दी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०९  मे २०२२) :-  महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये  पार पडलेल्या आठ जनसंवाद सभेत आजपर्यंत १ हजार २० नागरिकांनी सहभाग नोंदवत  प्रतिसाद दिला आहे.  विविध समस्यांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी तसेच महत्वपूर्ण  सूचनांचा अंतर्भाव प्रशासकीय कामकाजात करून घेण्यासाठी जनसंवाद सभा प्रभावी माध्यम ठरले आहे.

नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त पाटील  यांनी जनसंवाद सभेचा उपक्रम सुरु केला. दि. २१ मार्च २०२२ पासुन दर सोमवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत सुरु झालेल्या  महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा सुरु झाल्या.

Google Ad

प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान आणि सक्षमपणे राबवण्यासाठी जनसंवाद सभांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण ठरली आहे. आज ह प्रभाग मध्ये झालेल्या जनसंवाद सभेत पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत करावी, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, मलनि:स्सारण व्यवस्थापन, पदपथावरील अतिक्रमण, उद्यान विषया संदर्भात नागरिकांनी या जनसंवाद सभेमध्ये तक्रारीवजा सूचना केल्या. यावेळी वारंवार येणा-या तक्रारींवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रभाग स्तरावर नियोजन करण्यात आले.

जनसंवाद सभेची वेळ ही सकाळी १० ते १२ वा. अशी आहे, परंतु १२ नंतरही ‘ह’ प्रभाग कार्यालयात नागरिकांनी गर्दी केल्याचे, प्रत्येक जनसंवाद सभेस दिसून येते. नागरिक तक्रार निवारण होती म्हणून येतात की होत नाही म्हणून येतात हे या गर्दीवरून कळून येत नाही. तसेच या जनसंवाद सभेत अनेक नागरिक राजकीय पक्षाच्या वतीने सार्वजनिक तक्रारी करताना दिसून आले.

‘ह, या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले. तर क्षेत्रीय अधिकारी म्हणूनविजयकुमार थोरात यांनी कामकाज पाहिले. आजपर्यंत झालेल्या सर्व आठ जनसंवाद सभांमध्ये १४६ इतक्या लोकांनी आपले म्हणणे मांडले आहे.

▶️अशा होत्या काही तक्रारी :-

महानगरपालिकेने माझी इमारत रोड वायडिंग मध्ये येत असल्याने ती पाडली, तरी त्यावेळीमाझ्याकडून त्यावर्षीची संपूर्ण कर आकारणी करण्यात आली.
(चांदमल गांधी, कासारवाडी)

प्रभाग क्र.३१ कृष्णा चौक येथील सुर्यमुखी दत्त मंदिरा जवळ नागरिकांना जाण्यायेण्यास अडथळा करणारी वाहने हटवावित.
(गणेश चोभे, विनायक नगर)

संत तुकाराम नगर (YCM हॉस्पिटल जवळ), कमी दाबाने पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे, ड्रेनेज लाईन आणि चेंबर तुंबत आहेत. ओपन जिम मधील इस्ट्रुमेंटच्या बेरिंग तुटल्या आहेत.
(शेरबहादूर खत्री, नागरिक)

दापोडी तील फुगेवाडी ते दापोडी ब्रिज बांधुन गेली १२ वर्ष झाली त्या ठिकाणी कामावर जाणा-या नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून फुगेवाडी ते दापोडी ब्रिज वरून जावे लागते, परंतु या फुगेवाडी ते दापोडी ब्रिज वर अजून ही दोन्ही बाजूस (फुटपाथ) पादचारी मार्ग बांधण्यात आला नाही. सतत अपघात होत असल्याने या ठिकाणी नागरिकांच्या जीवास धोका होण्याची शक्यता जास्त असते. गेली १२ वर्ष महापालिकेच्या या अंधकारभारावर पश्न चिन्ह उभे करून तातडीने त्या ठिकाणी फुगेवाडी ते दापोडी ब्रिज वर दोन्ही बाजूस (फुटपाथ) पादचारी मार्ग बांधण्यात यावा अशी मागणी शिवसेना च्या  सुषमाताई अजित शेलार ( शहर अध्यक्ष – भारतीय कामगार संघटना पिं.चिं.) यांनी ह प्रभाग च्या जनसंपर्क सभे मध्ये केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!