Google Ad
Editor Choice Health & Fitness Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील ४५ वर्षापुढील नागरिकांना … या केंद्रांवर मिळणार कोविशिल्ड लस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे २०२१) : कोविड-१९ आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनापैकी नागरिकांचे कोविड-१९ लसीरकण करणे हा महत्वाचा घटक आहे. दि.०१/०५/२०२१ पासून भारत देशामध्ये तसेच सर्व राज्यांमध्ये वर्ष १८ ते ४४ या वयोगटामधील नागरीकांचे कोविड-१९ लसीकरण करण्यात येणार असल्याचे मा. पंतप्रधान, भारत सरकार यांनी जाहीर केलेले आहे.

या अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कोविशिल्ड लस ५००० डोस प्राप्त झालेले असून फक्त वय वर्षे ४५ वर्षापुढील नागरीकांनी पहिला डोस घेतलेला आहे त्याच नागरीकांनी दुसरा डोस घेण्यासाठी उद्या दि.०७.०५.२०२१

Google Ad

🔴 या ठिकाणी होणार लसीकरण 🔴

▶️भोसरी :- सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, छत्रपती शाहू महाराज शाळा दिघी, संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल इंद्रायणीनगर, पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय च-होली,  प्राथमिक शाळा मोशी

▶️सांगवी :- कासारवाडी दवाखाना, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा पिंपळे गुरव, शितोळे शाळा सांगवी, बालाजी लॉन्स सांगवी, गणेश इंग्लिश मिडियम स्कुल दापोडी,

▶️तालेरा :- तालेरा रुग्णालय, बिजलीनगर दवाखाना, किवळे दवाखाना, गुरुव्दार वाल्हेकरवाडी, मनपा शाळा वाल्हेकरवाडी, मनपा शाळा पुनावळे, सेक्टर २९ रावेत,

▶️आकुर्डी :- हेगडेवार भवन, संजय काळे, आरटीसीसी, जाधववाडी, चिखली ,

▶️थेरगांव :- मनपा शाळा वाकड, मंगलनगर शाळा, भुमकरवस्ती शाळा, यशवंतराव चव्हाण स्कुल ग प्रभाग, कस्पटेवस्ती शाळा,

▶️वाय.सी.एम.एच- वाय.सी.एम.रुगणालय, नेहरुनगर दवाखाना,

▶️जिजामाता :- अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, काळेवाडी पवनानगर शाळा,

▶️यमुनानगर :- यमुनानगर रुग्णालय, स्केटींग ग्राऊंड सेक्टर २१, प्राथमिक शाळा म्ह्त्रेवस्ती

या लसीकरण केंद्रावर प्राधान्याने उपस्थित रहावे.

प्रत्येक लसीरकण केंद्राच्या ठिकाणी मर्यादित नागरीक/लाभार्थी यांना लसीकरण करण्यात येणार आहे. नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

Google Ad

About the author

Maharashtra14 News

21 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!