महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० ऑक्टोबर) : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी मध्यरात्री अवैधरित्या गॅस भरताना नऊ सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच महानगरपालिकेच्या जलतरण तलावात मंगळवारी धक्कादायक घटना घडली.
कासारवाडी येथील जलतरण तलावातून अचानक क्लोरीन गॅस लिकेज झाला. यामुळे तलावात पोहण्यासाठी आलेल्या २० ते २२ जणांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. परिसरात क्लोरीन गॅस पसरल्याने काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला आणि घसा दुखीचा त्रास सुरू झाला. काही नागरिकांना तर श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, जलतरण तलावात उतरलेल्या आणि जास्त त्रास होत असलेल्या नागरिकांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील मनपाच्या कासारवाडी जलतरण तलावात नेहमी अनेक जण पोहण्यासाठी येत असतात. मंगळवारी सकाळी अनेक जण पोहण्याचा आनंद घेत होते. त्यावेळी अनेकांना अचानक श्वास घेण्याचा त्रास सुरु झाला. तसेच खोकला येऊ लागला आणि गळ्याचा त्रास होऊ लागला. जलतरण तलावच नाही तर या परिसरात ५०० मीटर पर्यंत लोकांना हा त्रास सुरु झाला. जलतरण तलावातील क्लोरीन गॅस लिक होऊन परिसरात पसरला होता. परिसरातील नागरिकांना त्रास सुरु होताच या परिसरातील रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला.
तलावातून क्लोरीन गॅस लिक झाल्यामुळे या ठिकाणी असलेल्या २० ते २२ जणांना तसेच सुरक्षारक्षकांना त्रास सुरु झाला. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले. (Pimpri News) त्यांनी संबंधित व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. ११ जणांना उपचारासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१ मार्च - राज्यातील सर्व मुलींना शासनातर्फे गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ फेब्रुवारी : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य…
॥ रुग्ण सेवा हीच खरी ईश्वरसेवा ॥ महाराष्ट्र 14 न्यूज, दि २५ फेब्रुवारी : महाराष्ट्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 18/2/2025, पिंपळे गुरुव : प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यु मिलेनियम इंग्लिश…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी…
सावधान ! पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी…