महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जानेवारी) :क्षेत्रीय कार्यालयाकडील जनसंवाद सभेमध्ये नागरीकांच्या प्राप्त होणा-या तक्रारी विहित वेळेत निकाली काढण्याकरीता प्रत्येक सोमवार ऐवजी प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्याबाबात दिनांक १७/११/२०२२ रोजी मा. आयुक्त तथा प्रशासक यांच्या मान्यतेने आदेश निर्गत करण्यात आलेले आहेत.
मा.प्र. उप जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय (निवडणूक शाखा) पुणे यांनी दि. १८/०१/२०२३ रोजीचे पत्रान्वये २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक २०२३ घोषित झाल्याने तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. सदर आचारसंहिता लागू झाली असल्याने महापालिकेच्यावतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय आयोजित केली जाणारी जनसंवाद सभा आचारसंहिता कालावधीत होणार नाही. याबाबत संबंधित सर्व विभाग / अधिकारी तसेच महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी नोंद घ्यावी. प्रकरणी प्रसिध्दी देण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभागांनी करावी.

प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून करण्यात यावी. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.