महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ ऑक्टोबर) : महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन आणि क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याने पुनीत झालेल्या चिंचवडनगरीमध्ये दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ ते २४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान चिंचवड नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले आहे.
५० x २१ आकार व ३५ फुट उंच अशा भव्य आकाराचे मंदिर प्रतिकृती व साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भव्य प्रतिकृती ३५० व्या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त महाराजांना अभिवादन.. गजानन पोपट चिंचवडे यांनी या महोत्सवाची सुरुवात केली होती. आज सलग १० वर्षापासून ही महोत्सव परंपरा सुरू आहे. रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ०२:१५ वा देवीची स्थापना रा.स्व.संघ संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत श्री व सौ मिलिंदजी देशपांडे आणि रा. स्वं .संघ विभाग कार्यवाह श्री व सौ मुकुंद कुलकर्णी यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे.
दुपारी ४ वा श्रीमंत समर्थ गर्जना वाद्यपथक ट्रस्ट, चिंचवड यांचे ढोल वादन होईल. त्यानंतर भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांचे हस्ते देखाव्याचे उद्घाटन ,आरती संपन्न होणार आहे.तसेच स्वानंद धुपारती मंडळाची श्री मोरया गोसावी पदे व धुपारती होईल. सोमवार दि. १६/१०/२०२३ रोजी आभा कार्ड योजना नाव नोंदणी शिबिर, व डायबेटीज व बी पी रुग्ण तपासणी शिबिर सकाळी १० ते ४ या वेळेत होईल. दि. १७ व १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मोफत नेत्र चिकित्सा शिबीर व सवलतीच्या दरात चष्मे वाटप शिबीर घेण्यात येणार आहे.
गुरुवार दि. १९/१०/२०२३ ललिता पंचमी निमित्त सकाळी ०९:३० कुमारिका पूजन आयोजित करण्यात आले आहे. तसेच सकाळी ६ वा. श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची काकड आरती होणार आहे. शुक्रवार दि. २०/१०/२०२३ रोजी सकाळी ९:३० वा सोहम योग साधना साधक यांचे समवेत कुंकूमार्चन आयोजित करण्यात आले आहे. व दुपारी ४ वा. श्रीसूक्त पठण आयोजित करण्यात आले आहे.
दि. २० ते दि.२४ ऑक्टोबर या कालावधीत श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या अक्कलकोट येथील पादुकांचा दर्शन सोहळा, पुर्ण नवरात्र कालावधीमध्ये तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी, माहुरगडची रेणुका या साडेतीन शक्तीपीठ दर्शनाचा सोहळा, सकाळी ९ वाजता व सायंकाळी ७ वा देवीची महाआरती, चिंचवडमधील विविध भजनी मंडळांची भजन सेवा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन चिंचवडमधील नगरसेविका अश्विनीताई गजानन चिंचवडे – पाटील जनसंपर्क कार्यालयासमोर, श्री मोरया गोसावी समाधी मंदिर रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…