Google Ad
Editor Choice

चिंचवडचे आमदार गोभक्त स्व. लक्ष्मण जगताप यांना गोभक्तांची अनोखी श्रध्दांजली … लोटे परशुराम गोशाळेत होम हवन व श्रींचा अभिषेक गोपुजन अभिषेक सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ जानेवारी २०२३) : चिंचवडचे दिवंगत आमदार गोभक्त स्व. लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रध्दांजली म्हणून होम हवन व श्रींचा अभिषेक गोपुजन कार्यक्रम अभिषेक सोहळा गोशाळा संस्थापक कर्मवीर श्री.ह.भ.प. भगवान कोकरे महाराज (अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ रत्नागिरी जिल्हा) यांच्या वतीने आज दि. २२ जानेवारी २०२३ रोजी, स. ११.०० वा. श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान संचलित भक्ती शक्ती दाता दास हनुमान गोशाळा लोटे, परशुराम येथे करण्यात आला.

या कार्यक्रमास संजयजी पांड्ये (अध्यक्ष), महेश गोवळकर ( उपाअध्यक्ष), कार्याध्यक्ष गौरव गोविंदजी मुंदडा, ह.भ.प. श्री. भगवान कोकरे महाराज, दिपकजी ओकटे (सेक्रेटरी), विठ्ठलदास मुंदडा (सदस्य), प्रकाशजी पोफळे, सचिन आंग्रे , सचिन काते, राजेश पुरूषोत्तम पल्लोड, कोंडू विठू खरात, सुधाकर बगडे, गणेश गावडे, पंकज गावडे, रामदास कस्पटे, राजू नागणे, संदीप दरेकर व अनेक गोभक्त या कार्यक्रमात उपस्थित होते.

Google Ad

श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळा गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या ठिकाणी १०६५ गायींचे संगोपन आणि पालन करण्यात आले आहे. या गोशाळेकरीता लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनेक वेळा चाऱ्याच्या माध्यमातून मदत केली आहे, आणि आजही त्यांचा मित्र परिवार ही सेवा देत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांना गोमतेची सेवा करण्याची आवड होती ते स्वतः गाईना चारा खायला घालत आणि तिची धारही ते स्वतः काढत त्यामुळे त्यांच्या मागे त्यांचा संपूर्ण परिवार ही सेवा आजही करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

या गोशाळेत सुमारे १०६५ गायींचे संगोपन उत्तम पद्धतीने केले जात आहे. यावेळी बोलताना ह भ प भगवान कोकरे महाराज म्हणाले, चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कार्य आणि योगदान खूप मोठे आहे, गोमाता हे ३३ कोटी देवदेवतांचे निवासस्थान आहे, ज्यांच्या सेवेने माणसाचे आयुष्य पार पडते. कुटुंबात सुख, समृद्धी आणि आनंद नांदतो. आपल्या जीवनात या गोष्टी अंमलात आणून गोमातेच्या सेवेसाठी भाऊंच्या सारखे सर्वांनी पुढे यावे, गायींची सेवा करणे हे गुणवत्तेचे काम आहे. आज या गोशाळेत असलेल्या या गोमातेला पाहून अनेकांना आनंद होत आहे, तो लक्ष्मणभाऊंच्यामुळे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!