Categories: Uncategorized

चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकित या २६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४मार्च) : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये एकूण वैध मतांच्या मतांपैकी एक षष्टांश (१/६) पेक्षा कमी मते मिळाल्यामुळे २६ उमेदवारांची प्रवर्ग निहाय जमा करण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी निर्गमित केले आहेत. निवडणुकीमधील या उमेदवारांची सुरक्षा ठेव जप्त रक्कम “इतर प्रशासकीय सेवा – ०२- निवडणूक – १०४-शुल्क, दंड आणि जप्ती. इतर पावत्या – जप्त केलेली सुरक्षा ठेवींची रक्कम” या लेखाशीर्षाखाली जमा करण्यात आली आहे, अशी माहिती श्री ढोले यांनी दिली आहे.

लोकशाहीमध्ये निवडणूक म्हणजे एक महापर्व असते. या काळात अनेक लोक निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात आणि आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा सामना करतात. मात्र, या सामन्यात उतरण्याचे काही नियम असतात. त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे उमेदवाराची अनामत (डिपॉझिट) रक्कम…  निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निश्चित अशी अनामत रक्कम भरावी लागते. जर उमेदवाराने निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण केल्या नाहीत, तर हीच अनामत रक्कम आयोगाकडून जप्त केली जाते. याच स्थितीला म्हणतात उमेदवाराचे ‘डिपॉझिट’ जप्त होणे.

भारत निवडणूक आयोगाकडून २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०२३ कार्यक्रम दि. १८ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीमध्ये एकूण २८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. दि. २६ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान झाले, तर दि. २ मार्च रोजी या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम १५८ नुसार जर एखादा उमेदवार त्या मतदार संघातील एकूण उमेदवारांना मिळालेल्या वैध मतांपैकी १/६ इतकी मते मिळवू शकला नाही (NOTA वगळून) तर उमेदवाराने जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम ३४, १ (अ) नुसार अन्वये जमा केलेली अनामत रक्कम खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १० हजार रुपये आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ हजार रुपये इतकी आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम १५८ अन्वये या उमेदवारांना या पोटनिवडणूकीतील एकूण वैध मतांच्या मतांपैकी एक षष्टांश (१/६) पेक्षा कमी मते मिळाल्यामुळे अशा प्रवर्ग निहाय उमेदवारांची जमा करण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत २ लाख ८४ हजार ३९७ वैध मते आहेत.

त्याप्रमाणात एक षष्टांश (१/६) पेक्षा अधिक म्हणजेच ४७ हजार ४०० इतक्या मतांपेक्षा अधिक मते मिळवणे आवश्यक होते. तेवढी मते मिळवू न शकल्याने २ उमेदवार वगळता इतर सर्व २६ उमेदवारांची एकुण सुमारे १ लाख ९० हजार एवढी अनामत जप्त करण्यात आली आहे. अनामत रक्कम जप्त करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये राहुल कलाटे, सुभाष बोधे, गोपाळ तंतरपाळे, सिद्दिक शेख, प्रफुल्ला मोतलिंग, बालाजी जगताप, किशोर काशीकर, श्रीधर साळवे, दादाराव कांबळे, डाॅ.मिलिंदराजे भोसले, अमोल(देविका) सुर्यवंशी, रफिक कुरेशी, मनोज खंडागळे, तुषार लोंढे, राजू काळे, हरिष मोरे, अॅड.सतिश कांबीये, जावेद शेख, सुधीर जगताप, अजय लोंढे, मिलिंद कांबळे, मोहन म्हस्के, सोयलशहा शेख, सतिष सोनावणे, चंद्रकांत मोटे आणि अनिल सोनवणे यांचा समावेश आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात….* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर, शाळकरी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांचा सहभाग….

*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…

5 days ago

पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे संयुक्त उपक्रमातून एक लाख देशी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन

*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…

1 week ago

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने दिव्यांग सर्वेक्षणासाठी आशा सेविकांना देण्यात आले विशेष प्रशिक्षण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…

2 weeks ago

शंभरपेक्षा अधिक घरफोड्या, सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर  : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…

2 weeks ago

पुण्यात इंटेन्सिफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयात ‘एचआयव्ही’बाबत जागृती

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…

3 weeks ago