Google Ad
Editor Choice Sports

रविवारी ‘मटा किड्झथॉन’ उत्साहात साजरा .. चिमुकल्यांनी अनुभवली ‘फिनिशर फिटनेस’चा फंडा आणि फुल्ल टू धमाल!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : उत्सव फिटनेसचा पुणेकरांच्या सहभागाचा ‘ मटा’च्या वाढत्या लोकप्रियतेचा ‘ फिटनेसशी करा मैत्री , ‘ असा संदेश देणारा ‘ महाराष्ट्र टाइम्स’चा ‘ आरोग्यम किड्झथॉन ‘ रविवारी जल्लोषात साजरा झाला .

सहभागी झालेल्या मुलांसह पालकांनी या निमित्ताने ‘ फिटनेस’शी मैत्री करत फुल्ल टू धमाल आणि मजा – मस्ती अनुभवली . व्यायाम करा , खेळा आणि तंदुरुस्त राहा , हा संदेश यानिमित्ताने ‘ किड्सथॉन’ने दिला . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात या उपक्रमाला सकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली . सकाळच्या बोचरी थंडीतही मुले उत्साहात स्पर्धेत सहभागी झाले होते . या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांबरोबर पालकही सहभागी झाले होते . सकाळी लवकर न उठणारी मुलेही या निमित्ताने लवकर उठली आणि उत्साहाने स्पर्धेत सहभागी झाली .

Google Ad

स्पर्धेपेक्षाही इथे प्रत्येकाने एन्जॉय केला ‘ राहाल फिट , तर राहाल हिट ‘ हा आरोग्याचा मंत्र . या उपक्रमाला नागरिकांबरोबर सेलिब्रिटींकडूनही दाद मिळाली . टॉडलर ( वयोगट २ ते ४ ) , झिप ( ४ ते ७ ) , झॅप ( ७ ते १२ ) , झूम ( १२ आणि त्या पुढील ) आणि ड्रीम रन ( विशेष मुले ) या वयोगटात ‘ किड्झथॉन ‘ रंगली . या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विशेष मुले यात उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने धावताना दिसली .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!