Google Ad
Editor Choice Education

नवी सांगवीतील द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिन साजरा.

महाराष्ट्र 14 न्यूज, दिंनाक : १४/११/२०२२,नवी सांगवी प्रतिभा महिला प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये साजरा करण्यात आला. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी शाळेमध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी होते. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा त्यात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तर तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कौशल्यात्मक कार्यक्रम विविध कौशल्य यांचे आयोजन केले गेले.

Google Ad

यावेळी कार्यक्रमांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजू अण्णा जगताप, सचिव शंकर शेठ जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. संस्था सदस्य स्वाती पवार ,पूर्व प्राथमिक प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ जयश्री माळी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ.इनायत मुजावर व सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शिक्षक कर्मचारी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement