महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ सप्टेंबर) : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात गणेशोत्सवाचा धुमधडाका सुरु आहे. त्यात आज अनंत चतुर्थी असल्याने राज्यभरात जोरदार उत्सव साजरा केला जात आहे. कोणी ढोल ताशाच्या आवाजात तर कोणी डीजेच्या दणदणाटात बाप्पाला निरोप देतं आहे.
असे असतानाच पुण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. घरात दु:खद निधन झाल्याने गणपती मिरवणूकीला घराजवळून जाताना डीजे वाजवण्यास मनाई केली होती. मात्र आरोपींनी याचा राग मनात धरून कुटुंबियांना मिरवणूकीनंतर बेदम मारहाण केली आहे. 25 सप्टेंबरला ही धक्कादायक घटना घडली आहे.
गणेश विसर्जनाची सोमाटणे फाटा येथे डीजेच्या दणदणाटात मिरवणूक चालू होती. त्याचवेळी येथील एक कुटुंब आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दुःख सागरात बुडालेले होते. कुटुंब दुःखात असताना गणेश विसर्जन मिरवणूक घराजवळून जात असताना कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, आमच्या मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे आम्ही दुःखात आहोत. म्हणून तुम्ही घरासमोर डीजे लावू नका. पुढं जाऊन तुम्ही डीजे लावा. त्यानंतर डीजे बंदही करण्यात आला.
ज्या मंडळाने डीजे लावून मिरवणूक चालू केली होती, ती बंद करावी लागली म्हणून मंडळाच्या काही मुलांना राग आला. त्या कुटुंबाने डीजे बंद करायला लावला म्हणून 21 जणांनी काठ्या, कोयता आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. त्यामध्ये कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत.
कुटुंबाला मारहाण केल्या प्रकरणी आता तळेगाव पोलिसात 21 जणांविरोधात सुनील प्रभाकर शिंदे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी सुनील बंदा रजपूत (वय 28), मुकेश करसन रजपूत (26), रवी करसन रजपूत (30), सनी करसन रजपूत (32), प्रवीण करसन रजपूत (30), अक्षय ज्ञानेश्वर काकडे (28), अतुल वेलसी रजपूत (21), कृष्णा बलभीम खराते (23), रवी हिरा रजपूत (28), संदीप रमेश रजपूत (29), विशाल काळुराम रजपूत (29), संतोष काळुराम रजपूत (25), विलास हिरा रजपूत (22), अनिल हिम्मत रजपूत (31), करसन जयंती रजपूत (50), दीपक हिम्मत रजपूत (32), आकाश अशोक रजपूत (21), काळुराम भिका रजपूत (55), वसंत भिका रजपूत (51), अमित वेलसी रजपूत (24) आणि रमेश जयंती रजपूत (50, सर्व रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा) यांच्यावर गुन्हा नोंद करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०५ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ५ मार्च २०२५ : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय…
शहरातील दहा पत्रकारांनी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१ मार्च - राज्यातील सर्व मुलींना शासनातर्फे गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ फेब्रुवारी : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य…
॥ रुग्ण सेवा हीच खरी ईश्वरसेवा ॥ महाराष्ट्र 14 न्यूज, दि २५ फेब्रुवारी : महाराष्ट्र…