Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट, म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६जुलै) : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर स्वप्नीलच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका,’ अशा शब्दांत स्वप्नीलच्या कुटुबियांना धीर दिला. स्वप्नील लोणकरचे आई, वडील आणि बहिण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलची बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल. यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

▶️मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Google Ad

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वनीलच्या आई छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला. यावेळी सह्याद्री अतिथीगृहावर विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!