महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३० नोव्हेंबर २०२३ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शासनातर्फे आयोजित “मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड” स्पर्धेत भाग घेतलेला असून सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी यासाठी कसून तयारी करावी असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.
महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाकडील १५ सप्टेंबर २०२३ पत्रानुसार राज्यातील महानगरपालिकांमध्ये वॉर्ड स्तरावर “मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा – २०२३” या १५ सप्टेंबर ते १५ डिसेंबर २०२३ कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.त्यामध्ये महापालिकेने सहभाग घेतला असून प्रथम क्रमांक येणा-या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू आहे.यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी क्षेत्रिय अधिका-यांसमवेत आज बैठक घेतली त्यावेळी त्यांनी अधिका-यांना निर्देश दिले.
आजच्या बैठकीस आरोग्यप्रमुख यशवंत डांगे,क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे,अमित पंडित,आण्णा बोदडे, अंकुश जाधव,राजेश आगळे,उमेश ढाकणे,आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, उप अभियंता हरविंदरसिंग बन्सल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सहाय्यक आरोग्याधिकारी उपस्थित होते.
“मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा – २०२३” करीता महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे –
Ø वॉर्ड सौंदर्यीकरण करणे,चौक सुशोभिकरण,शिल्पे/कारंजे उभारणी
Ø घरोघरी जाऊन १०० टक्के विलगीकृत कचरा संकलन करणे
Ø सर्व रस्त्यांची सफाई,बाजार परिसरात लीटर बिन्स,कचरा कुंडी मुक्त वॉर्ड
Ø वॉर्डमध्ये प्लास्टिक बंदी करणे
Ø वॉर्डातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणावर कार्यवाही करणे
Ø मालमत्ता कर संकलन
Ø सार्वजनिक वाचनालयांची उपलब्धता व व्यवस्थापन
Ø वॉर्डमधील पदपथांवरील तसेच इतर ठिकाणांवर नैसर्गिक घटकांचा वापर करुन फर्निचर व सौंदर्यीकरण करणे
Ø फेरीवाला विरहीत क्षेत्र/फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे
Ø सार्वजनिक वाहनतळ-रिक्षा / ट्रक्सी स्टँडची ठिकाणे निश्चित असणे व त्यांची व्यवस्थित निगा राखणे
Ø सार्वजनिक वाहतुक व्यवस्था – सुरक्षित व आच्छादित बस थांबे
Ø सार्वजनिक प्रसाधनगृहांची उपलब्धता
Ø बाजाराच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये व्यवस्था
Ø तीर्थस्थळ / वारसास्थळाची जपणूक करणे
Ø भुयारी गटारांवर मॅनहोल झाकणे सुस्थितीत असणे
Ø सार्वजनिक उद्याने – स्थानिक उद्यानांची निगा राखणे – मुलांसाठी खेळण्याची साधने असणे व ती सुस्थितीत राखलेली असणे
Ø रस्त्यांची देखभाल व सुशोभिकरण,दिशा दर्शक फलक,लेन मार्किंग,स्टीट लाईट (पथ दिवे),सीसीटीव्ही व्यवस्था कार्यान्वित असणे
Ø होम वेस्ट कंपोस्टींग अण्ड बल्क वेस्ट जनरेटर प्रक्रिया करणे
Ø गृहनिर्माण संकुलातील रेन वॉटर हार्वेस्टींग
Ø वॉर्ड मध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणे
Ø “मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा – २०२३” राज्यस्तरावर घेण्यात येईल व त्यात राजयस्तरावर मुल्यांकन करुन वर्गनिहाय सर्वाधिक गुणवत्ता प्राप्त ३ वॉर्डाची निवड करण्यात येवुन त्यांना राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येईल.
Ø सर्व पात्र शहरांनी स्पर्धेत सहभागी होणे बंधनकारक राहील.
Ø सदर स्पर्धा दिनांक १५ सप्टेंबर ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत असेल.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी बक्षीसांची रक्कम पहिला क्रमांक तीन कोटी, दुसरा क्रमांकांसाठी दोन कोटी तर तिस-या क्रमांकासाठी एक कोटी अशी आहे.
महापालिकेच्या वतीने या स्पर्धेसाठी अंतर्गत पूर्व तयारी करण्यात येत असून याकरीता महापालिका स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी बैठकीत दिली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…