महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनही नेते हे मंत्रालयात आले. त्यांनी मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमांना वंदन केले. शपथविधी झाल्यानंतर पहिल्या तासातच महायुती सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात झाली. शपथविधीनंतर लगेचच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हे सरकार गतिमान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे दाखवून दिले आहे.
मंत्रालयात गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे लाडक्या बहिणींनी स्वागत केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यात ते म्हणाले की, मागच्या अडीच वर्षांत घेतलेले निर्णय यापुढेही नेले जातील. सर्व समाजांना घेऊन जाणारे लोकाभिमूख सरकार पुढील काळात पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबला || ॥ ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ॥…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.३० नोव्हेंबर : राज्यात 5 तारखेला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २९ नोव्हेंबर २०२४ - नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी अजूनही बैठका सुरू आहे.…