Google Ad
Editor Choice

नवी सांगवीतील कवडे नगर येथे श्री स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार सेवा केंद्रात श्री दत्तजयंती निमीत्त अखंड नाम जप,यद्य-याग सप्ताह

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्‍वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम : ॥

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ डिसेंबर) : श्री स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार सेवा केंद्र कवडे नगर क्रांती चौक ,नवी सांगवी येथे श्री दत्तजयंती निमीत्त अखंड नाम जप,यद्य-याग सप्ताहाचे आयोजन दि. १ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२२ दरम्यान करण्यात आलेले आहे. या दरम्यान ३५० अधिक भाविक सेवेकर्यांनी सामुहिक श्री गुरुचरीत्र वाचन सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजु केली.

तसेच या कालावधी मध्ये श्री गणेश याग ,श्री गिताई याग, मनोबोध याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग , मल्हारी याग हजारो सेवेकर्यांच्या उपस्थितीमध्ये झाले. ७ दिवस अखंड श्री स्वामी चरीत्र वाचन,विणा वादन व श्री स्वामी समर्थ नाम जप सेवा रुजु करण्यात आली.

Google Ad

तसेच वर्ष भर दर रविवारी विनामुल्य बालसंस्कार वर्ग घेण्यात येतो. यात विविध स्तोत्र,मंत्र पठन,मराठी संस्कार मराठी अस्मिता ,हिंदुधर्मातील विविध सण,वार,व्रत वैकल्य,योगा,महापुरुषांचे चरित्र मुलांना शिकविले जातात. समाज घडवणे,माणुस नावाची एकच जात व माणुसकी नावाचा एकच धर्माचे शिकवण देण्यात येते. विविध समाजोपयोगी कार्य हे विनामुल्य सुरु आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!