Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपा उपआयुक्त आणि सहायक आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३ नोव्हेंबर  २०२२:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील उपआयुक्त आणि सहायक आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल करण्यात आला असून त्यांच्याकडे  आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेशाद्वारे नव्याने कार्यभार सोपविले आहेत.

     महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त विठ्ठल जोशी यांच्याकडे यापूर्वी दक्षता व गुणनियंत्रण (प्रशासकीय व तांत्रिक बाबींसह), माहिती व तंत्रज्ञान, नागरी सुविधा केंद्र आणि क्रीडा या विभागांची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, दक्षता व गुणनियंत्रण (प्रशासकीय व तांत्रिक बाबींसह) या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच उपआयुक्त जोशी हे सर्व विभागांकरीता समन्वयक म्हणून कामकाज पाहणार आहेत. त्यांची आस्थापना सामान्य प्रशासन विभागात असणार आहे.

तसेच सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे यापूर्वी निवडणूक व जनगणना (आधार कार्ड योजना) आणि प्रशासन विभागाचे कामकाज सोपविण्यात आले होते. आता त्यांच्याकडे क्रीडा, माहिती व तंत्रज्ञान, नागरी सुविधा केंद्र (आधार कार्ड योजना), निवडणूक व जनगणना या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची आस्थापना क्रीडा विभागात राहील. याबाबत स्वतंत्र आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत.  या आदेशाची अंमलबजावणी ३ नोव्हेंबर २०२२ पासून करण्यात येत आहे.     

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

18 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago