Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहर दौऱ्या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली … चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांची भेट … भेटीदरम्यान पहा काय म्हणाले, बावनकुळे …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि ०७ सप्टेंबर)  : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी (दि. ७) पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आले होते. यावेळी पिंपळे गुरव येथील चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली.

आगमी महापालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत आमची बारामती आणि मुंबई असे दोन्ही प्राधान्यक्रम नाहीत. सर्व निवडणुका आमच्यासाठी प्राधान्य क्रमाच्याच आहेत. असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले हे वक्तव्य केले.
पिंपरी चिंचवड शहर दौऱ्या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही फक्त एक गट असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी केली.

Google Ad

पक्ष संघटना मजबूत करणे याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला विरोध करणे असा होत नाही. एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असेल तर त्याला संपूर्ण ताकद आणि पाठबळ देण्याचे काम भाजप करेल. असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. सोबतच त्यांनी मनसे भाजप युती संदर्भात देखील सूचक वक्तव्य केलं. राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्या संदर्भात आतापर्यंत कुठलीही ठोस चर्चा झाली नाही. जसजसे दिवस पुढे जातील तस तशी चर्चा होईल, तसेच बारामतीसह देशातील 400 पेक्षा अधिक व राज्यात 45 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकू. परंतु, आजवर झाली नाही अशी लढत बारामतीत 2024 मध्ये पाहायला मिळेल, असे बावनकुळे म्हणाले.

आमदार लक्ष्मण जगताप, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप, बंधू विजूशेठ जगताप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शहरातील माजी महापौर, भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, भाजप समर्थक, कार्यकर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!