फ्रंटलाईन वर्कर म्हणून महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय यांच्यामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार नाही … पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी दिले आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.४ मे २०२१) :  शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि. १ मे पासून वय वर्षे १८ ते ४४ मधील व्यक्तींची लसीकरण कार्यवाही सुरु करण्यात आल्याने यापुढे बँक कर्मचारी, फार्मास्युटीकल, विक्रीकर कार्यालय, एलआयसी आदी कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचा-यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय यांच्यामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
याबाबत पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी,  क्षेत्रीय कार्यालये,  सर्व दवाखाने आणि रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत.

यापूर्वी बँक कर्मचारी, फार्मास्युटीकल, विक्रीकर कार्यालय, एलआयसी आदी कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचा-यांना त्यांचे ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची शहानिशा करुन त्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत प्रमाणित करण्यात येत होते.  या प्रमाणित करुन देण्यात आलेल्या अधिकारी कर्मचा-यांना महापालिकेच्या कोवीड लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्याबाबत मान्यता देण्यात आली होती.  दरम्यान, शासनाने दि. १ मे पासून वय वर्षे १८ ते ४४ मधील व्यक्तींच्या लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago