Google Ad
Uncategorized

मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा …. खडकवासला, पानशेत, वरसगाव व पवना धरणातून विसर्ग

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १८/०८/२०२५ व १९/०८/२०२५ रोजी सकाळी पावसाचे प्रमाण व खडकवासला पानशेत, वरसगाव व पवना धरण परिसरात १५० ते १८० मि.मी. पाऊस झालेला असल्याने आज दिनांक १९/०८/२०२५ रोजी धरणामध्ये पावसाचे येवा पाहता खडकवासला धरणातून सकाळी ८:०० वाजता २१७८ क्युसेक्स व सकाळी ९:०० वाजता ४१७० क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच सदर विसर्ग १०००० क्युसेक्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

तसेच खालील प्रमाणे तीनही धरणातून विसर्ग सोडण्यात येणार आहे.

Google Ad

१) पानशेत धरणातून सकाळी ८:०० वाजता ३९९६ क्युसेक्स.

२) वरसगाव धरणातून सकाळी ८:०० वाजता ३९०९ क्युसेक्स.

३) पवना धरणातून सकाळी ९:०० वाजता २८६० क्युसेक्स.

तसेच पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. तरी पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे नदीपात्रात काही तत्सम साहित्य, वाहने अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावी तसेच महानगरपालिका यांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात …

तथापि आपल्या स्तरावरुन संबंधित अधिकारी व विभागांना तात्काळ वार्ता देण्यात यावी व सर्व प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. श्वेता यो. कु-हाडे संनियंत्रण अधिकारी मध्यवर्ती पुरनियंत्रण कक्ष, पुणे यांच्या वतीने कळवण्यात आले आहे.

यांनी राहावे सतर्क :—

1. आपत्ती निवारण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

२. आपत्ती निवारण कक्ष, पुणे महानगरपालिका, पुणे

३. आपत्ती निवारण कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे (पवना व मुळशी)

४. मा. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

५. मा. पोलीस आयुक्त, आयुक्त कार्यालय (पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर / ग्रामीण), पुणे

६. PMRDA मुख्यालय कंट्रोल रुम, पुणे

७. MSEB मुख्यालय रास्ता पेठ, पुणे

 

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!