Google Ad
Editor Choice

Delhi : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ … केंद्र सरकारने कायदा मंत्रालयाचे मागवले मत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ फेब्रुवारी) : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकेल. केंद्रातील मोदी सरकार कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीवर विचार करत आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत (OPS) केंद्राच्या कायदा मंत्रालयाकडून मतं मागवण्यात आली आहेत. आता मंत्रालयाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.

कायदा मंत्रालयाच्या उत्तरानंतर निर्णय केंद्र सरकार त्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (OPS) देण्याचा विचार करत आहे, ज्यांच्या भरतीच्या जाहिराती 31 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्यापूर्वी जारी करण्यात आल्या होत्या. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, या मुद्द्यावर कायदा मंत्रालयाकडून मत मागवण्यात आली आहेत. त्यांचे उत्तर आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!