Google Ad
Editor Choice Uncategorized

महाराष्ट्राच्या राज्यपालांना केंद्राने परत बोलवावे : शहर कॉंग्रेसची मागणी —————राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी

महाराष्ट्र1 14 न्यूज,(दि. ५ मार्च २०२२) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी निंदाजनक वक्तव्य केले. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. याचा शहर पिंपरी चिंचवड कॉंग्रेसने शनिवारी (दि. ५ मार्च) भोसरी येथे निषेध केला.

यावेळी कॉंग्रेसचे युवा नेते राहुल ओव्हाळ यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले की, राज्यपाल कोश्यारी हे मनुवादी विचारसरणीचे आहेत. त्यामुळेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अवमान करणारे वक्तव्य केले. छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दाखविलेल्या समतेच्या मार्गावर पुरोगामी विचारांवर महाराष्ट्र उभा आहे. राज्यपाल आणि दानवे यांचे वक्तव्य म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा मनुवादी विचारांच्या भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने परत बोलवावे अन्यथा कॉंग्रेसच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Google Ad

हरिष डोळस यावेळी निषेध करताना म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी हे आरएसएसच्या प्रचारकाप्रमाणे वागतात. त्यांच्या डोक्यात संघाप्रमाणे मनूवादी विचार आहेत. ज्या रामदास स्वामींची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कधीही गाठभेट झालीच नाही. तरीही समाजामध्ये अशांतता निर्माण होणारे भाषण राज्यपाल करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या केंद्रीय मंत्री दानवे यांनी जाणिवपुर्वक एकेरी उल्लेख केला आहे. याची चित्रफित समाज माध्यमांमध्ये आहे. शिवाजी महाराजांचे फोटो वापरुन भाजपाने निवडणूकीत मते मागितली अशा मनुवादी भाजपचा पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस तीव्र जाहिर निषेध करीत आहे.


या निषेध आंदोलनास पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे, भोसरी विधानसभा कॉंग्रेस अध्यक्ष दिनकर भालेकर, चिंचवड विधानसभा प्रमुख माऊली मलशेट्टी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ जगताप, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफीक कुरेशी, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रविण कदम, तसेच इस्माईल संगम, झेवियर अँथोनी आदींसह कॉग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होत. त्यांनी राज्यपाल कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री दानवे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!