श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना संपर्क अभियानासाठी
श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या कलशाचे पिंपळे गुरव येथील श्री तुळजा भवानी मंदिरात आगमन झाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आणि परिसरातील नागरिकांकडून कलशाचे पूजन करून श्री हनुमान मंदिर व पुढे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे रामभक्तांच्या पूजनासाठी कलश ठेवण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कलशाचे पूजन करून महाआरती करण्यात आली.
पिंपळे गुरवचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री भैरवनाथ मंदिरामध्ये सुरु असलेल्या भैरवनाथ जन्मोत्सव कीर्तन सोहळ्यात देखील सहभागी होताना प्रसिद्ध कीर्तनकार हभप सागर महाराज बोराटे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आनंद घेतला. यावेळी पवित्र कलशाचे पूजन कीर्तनासाठी आलेल्या भाविकांनी देखील केले. यावेळी सर्वच वातावरण भक्तीमय झाले होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…