Google Ad
Uncategorized

सांगवीच्या मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागात प्रजासत्ताक दिन व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जानेवारी) : आज शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागात 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे व स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या मैदानात मोठ्या उत्साहात करण्यात आले होते ,

अत्यंत आनंददायी अशा वातावरणात सकाळी सात वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर उषाताई उर्फ माई ढोरे ,मुख्याध्यापिका प्रमिला जाधव ,
नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संकपाळ सर , श्री. राजेंद्र मोरे, ज्येष्ठ शिक्षक शरद ढोरे ऍड .नितीन कदम सौ.स्नेहलता जगताप. सौ.आदिती निकम
यांच्या उपस्थितीत प्राचार्य संकपाळ सर यांचे शुभ हस्ते ध्वज फडकविण्यात येऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत तसेच संविधान प्रतिज्ञा म्हणण्यात आली,श्री.राजेंद्र मोरे यांनी आपल्या जोशपूर्ण मनोगतात आपल्या भारत देशाचे वर्णन करून सैनिकांविषयी आदर व्यक्त केला व मोठे होऊन सैनिक होण्याविषयी आवाहन ही केले.

Google Ad

यानंतर विविध गुण दर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये देशभक्तीपर गीतांमध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर सामूहिक नृत्य सादर केली,
विद्यालयात नवीनच समायोजन झालेले सहशिक्षक श्री प्रल्हाद झरांडे यांचे मुख्याध्यापिका प्रमिला जाधव यांनी स्वागत केले,
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री नंदकुमार जाधव, श्री वायसे, श्री भोईटे सौ वंदना फडतरे. सौ.स्वाती काटकर ,मनीषा दरेकर . सौ.शिंदे सुहासिनी व बालवाडी विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले .

कार्यक्रमाचे ध्वज संचलनाचे निवेदन सौ लबडे सविता यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री प्रल्हाद झरांडे यांनी केले व आभार प्रदर्शन सौ अंजली पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सुप्रिया मोरे याचा सुरेल आवाजात वंदे मातरम् म्हटले गेले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!