Google Ad
Editor Choice

भाजपच्या अद्भुत विजयाचा विजयोउत्सव नवी सांगवी-पिंपळे गुरव येथे जल्लोष्यात साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मार्च) : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर या पाच राज्यातील झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयी घोडदौड निकाला बद्दल पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी तर्फे शहरात विजयोत्सव साजरा करण्यात आला.

भाजपाला चार राज्यांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाने आनंदित होऊन पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथेही भाजपाने नागरिकांना पेढे वाटत जल्लोष साजरा केला.

Google Ad

देशातील पाच राज्यांच्या विधानसभां निवडणुकीत देशप्रेमी नागरिकांनी भारतीय जनता पार्टी ला दिलेले भरघोस मतदान मुळे भाजपाची विजयी घौडदौड म्हणजे देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी च्या नेतृत्वाखाली भारत बलशाली होवून व केलेल्या विकास कामांना मतदारांनी विजय कौल दिल्याची प्रतिक्रिया चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज या विजयाप्रसंगी बोलताना दिली.

नवी सांगवी पिंपळे गुरव येथील कृष्णा चौक येथील भाजपा कार्यालया समोर तसेच परिसरात विजय रॅली काढून ढोल ताशा च्या गजरात पेढे वाटप करून जल्लोषात विजय उत्सव साजरा केला व उत्तर प्रदेश झाकी है : महाराष्ट्र आभी बाकी है या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!