द न्यु मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ग्रॅज्युएशन डे साजरा …
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल पूर्व प्राथमिक विभागातील (UKG) विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ चे मुख्य संपादक डॉ. देविदास शेलार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विद्यार्थ्यांना गुणपत्रक व वर्षभरातील कामकाजाबद्दल गुणगौरव पत्र देण्यात आले.
एक अनोखा उपक्रम म्हणून या ‘ग्रॅज्युएशन डे’ साठी विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही सहभाग घेतला असल्याचे यावेळी पहायला मिळाले. यावेळी आपल्या चिमुकल्याच्या वर्षभरातील कामगिरीबद्दल पालक समाधानी होते व विद्यार्थ्यांनी देखील या क्षणाचा आनंद लुटला प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये निकाल हा अतिशय महत्त्वाचा क्षण असतो, हा निकलच आयुष्याला वेगळी दिशा देत असतो, आपला पल्या हे पालकांचे भविष्य नसून पूर्ण देशाचे भविष्य आहे, आणि या भविष्याला आकार देण्याचे कार्य बालकांच्या आयुष्यात शाळा आणि शिक्षक करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल’ त्यांच्या विविध प्रकारच्या उपक्रमातुन दाखवून देते. असाच एक आगळा वेगळा ‘ग्रॅज्युएशन डे’ हा उपक्रम शाळेच्या वतीने आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राबविण्यात आला, त्यास मुलांच्या बरोबर पालकांनीही आनंद घेत साजरा केला.
यावेळी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री माळी यांनी पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक विभागासाठी घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख उपस्थित पालकांना करून दिली तसेच प्राथमिक विभागात विद्यार्थी दाखल झाल्यानंतर घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची ओळख करून देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. देविदास शेलार म्हणाले, “स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी लावलेला हा वटवृक्ष आता बहरतो आहे, भाऊंनी आपल्या भागातील सर्वसामान्यांच्या मुलांना आपल्याच भागात चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून या शाळेची उभारणी केली, तुम्ही सर्व शिक्षक शाळेत असे आगळे वेगळे उपक्रम घेऊन भाऊंचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यास पालकांनी साथ दिल्यास या शाळेत आदर्श विद्यार्थी घडतील आणि हे विद्यार्थी च तुमचे आमचे उद्याचे भविष्य आहे.”
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री .विजू अण्णा जगताप सचिव श्री. शंकरशेठ जगताप यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच संचालक मंडळ सदस्य स्वाती पवार मॅडम, श्री देवराम पिंजण सर, पूर्व प्राथमिक प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. जयश्री माळी मॅडम ,माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सौ चेतना पाटोळे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षक ते कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…