Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात येथे आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात येथे आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सर्व या भागातील जेष्ठ नागरिक महिला यांनी मोठा सहभाग नोंदविला. योगाचे महत्व, दैनंदिन जीवनामध्ये योगा विषयी चांगल्या सवयी, भौतिक ज्ञान गरजेचे आहे. दररोज योगा करून जीवन आनंददायी सुखकर बनवा असे आवाहन मा. शंकरशेठ जगताप यांनी केले. यावेळी योग शिक्षकांनी योगाची विविध आसने करून दाखवली व करून घेतली.

Google Ad

योगा हा केवळ शारीरिक व्यायामप्रकार नसून त्याचा मानसिकतेशीही संबंध आहे. मानसिक अवस्था सर्व आजारांचे मूळ कारण आहे. मन स्वस्थ असेल तर शरीरही उत्तम राहाते. हायपर टेंशन, डिप्रेशन, अपचन, निद्रानाश, ब्लडप्रेशर, डायबिटीस, कर्करोग, स्पॉंंडीलायटीस, सायटिका, लठ्ठपणा यासारख्या आजारांपासून दूर राहता येऊ शकते. अलोपॅथी उपचाराने आजार तात्पूरते दूर करता येऊ शकतात. मात्र कायमस्वरूपी उपाय केवळ योगामध्येच आहे. योगामुळे चित्तवृत्तीचे शमन होत असल्याने वासना व भावनांवर मात करता येते. तसेच स्वार्थ, राग व अहंकारासारख्या दुर्गुणांपासून दूर राहण्यास मदत होते.

दररोज नियमित किमान तासभर योगा, प्राणायाम व आसने केल्याने मन प्रसन्न राहून दैनंदिन कामे करताना नवी ऊर्जा मिळते. शरीर सुदृढ राहून विविध आजार व व्याधींपासून मुक्ती मिळते. त्यामुळे लहानांसह, तरुण व ज्येष्ठांनी निरंतर योगा करावा, असे आवाहन भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकरशेठ जगताप यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!