महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ मे) : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. न्यायालयाच्या निकालाने शिंदे- फडणवीस सरकारला अभय मिळाल्यानंतर आत्ता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा गेली नऊ महिने रखडलेला विस्तार आता लवकरच होणार असून, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौर्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
मे महिनाअखेरीसच हा विस्तार करून शिंदे-फडणवीस सरकार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत.
राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे बोलले जात असताना, भाजपने शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना यश आले तर मंत्रिमंडळात काही जागा येणार्यांसाठी असाव्यात म्हणूनही त्या रिक्त ठेवल्याची चर्चा भाजपमध्ये होती. मात्र, आता भाजप-शिवसेना आपल्या जागा भरणार आहे. मेअखेरीस हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
▶️नवीन मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ चेहर्यांना मिळू शकते संधी?
शिंदे गटातून बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय शिरसाट, योगेश कदम, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावर यांची नावे चर्चेत आहेत.
भाजपमधून राणा जगजितसिंह पाटील, रणधीर सावरकर, नितेश राणे, प्रशांत ठाकूर, योगेश सागर, माजी मंत्री संजय कुटे, जयकुमार रावल, पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ, मुरबाडचे आमदार किसन कथोरे अशा चेहर्यांना संधी मिळू शकते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…