महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ ऑगस्ट) : मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट करण्यात येण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती.
आज सकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी फोन करणार्याला कोणती ट्रेन, बॉम्ब कुठे ठेवला आहे, असे विचारले असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही.
जुहूच्या विलेपार्ले परिसरातून फोन करत असल्याचे सांगून कॉलरने फोन बंद केला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता त्याने जुहू येथून फोन केल्याचे निष्पन्न झाले. काही वेळाने फोन करणाऱ्याने त्याचा मोबाईल बंद केला. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीस ठाण्याला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमवर कॉल करून खोटी माहिती देणाऱ्याला आरोपीला पोलिसांनी केले अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव अशोक शंकर मुखीया असून त्याचं वय 25 वर्ष आहे. या कॉलरने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करुन ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याचं सांगितलं होतं. पोलिसांना या कॉलचं लोकेशन ट्रेस केल्यावर कुर्ला, ठाणे, कल्याण, टिळकनगर अशी वेगवेगळी ठिकाणी दिसून आलं. कॉलरचं लोकेशन शाह हाऊस मोरगांव जुहू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या कॉल करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. आरोपीला पोलीस ठाण्यात आणले असून पुढील कारवाई करण्याची प्रकिया सुरु आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…