Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘भाग्यदेव घुले’ यांची सोशेल मीडियाच्या माध्यमातून साद … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारावे प्रत्येक प्रभागात ५० बेडचे कोविड सेंटर!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील प्रत्येक प्रभागात 50 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात बाबत भाग्यदेव घुले यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून साद दिली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वत्र श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जात असताना अशा ठिकाणी कोरोनाची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, अशा वेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याचे काम चालू करण्यात यावे, शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरात ३२ प्रभाग आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील रुग्ण हे त्या प्रभागातच काॅरनटाईन करण्यात येतील, व नागरिकांना ते सोयीचे होईल.

Google Ad

तसेच महानगरपालिकेच्या शाळा या आज रोजी बंद अवस्थेत आहेत, त्यामुळे जलद गतीने कोविडसेंटर उभारण्यात लवकर मदत होईल. आणि त्या ठिकाणी ते उभारावे आशी विनंती भाग्यदेव घुले यांनी केली. एखाद्या गरिब गरजू नागरिकाला लवकर ॲम्बुलन्स मिळत नाही त्यामुळे प्रत्येक गावात जर कोविड सेंटर उभारला गेलं तर निश्चितच फायदा होईल, अशी विनंती आयुक्त राजेश पाटिल व महापौर उषा उर्फ माई ढोरे व उपमहापौर सौ हिराबाई (नानी) घुले यांना केली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!