Google Ad
Editor Choice

Mumbai : मंत्रिमंडळाची बैठक संपली … राज्यातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे महत्त्वाचे निर्देश!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७मे) : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी धोका अजूनही कायम आहे. कोरोना रुग्णांमध्ये दररोज होत असलेली वाढ लॉकडाऊनमुळे कमी होत असल्याचं दिसून येत आहे. असं असलं तरी १ जूननंतर लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्याची शक्यता कमीच आहेच. राज्यात रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी 10 ते 15 जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढतोय.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहचली होती. आजची राज्यातील रुग्ण संख्या कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे. आज एकदम लॉकडाऊन न उठवता तो 1 जूननंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादृष्टीने विभागास निर्देश दिले आहेत.

Google Ad

राज्यात कोरोनाचा धोका कमी होत असला तरी म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. पण आता कोरोनावर मात केल्यानंतर ही इतर आजारांचा धोका वाढत आहे. कोरोनावर मात केल्यानंतर तरुण वर्गामध्ये देखील काही दिवस वेगवेगळे साईड इफेक्ट दिसत आहेत. जे चिंता वाढवणारे आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!