Google Ad
Editor Choice

Khadki : कै. शांताराम बाईत प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण दिनाचे औचित्य साधून शिक्षक गौरव पुरस्कार २०२१ प्रदान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४सप्टेंबर) : शिक्षणाला आज प्रचंड महत्त्व आले असून ऑनलाईन शिक्षणामुळे मात्र विद्यार्थ्यांची अधोगती होत आहे, गरीब गरजू हुशार विद्यार्थ्यांकडे अँड्राइड फोन अथवा नेटसाठी पैसे नसल्याने त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे, मात्र गरीब होतकरू गरजू विद्यार्थ्यांना सर्वतोपरी शिक्षणासाठी प्रत्येक शिक्षकाने मदत करणे गरजेचे असल्याचे उद्गार एसव्हीएस हायस्कूलचे अध्यक्ष फ्रान्सिस डेव्हिड यांनी काढले.

कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षकांचा शिक्षक गौरव पुरस्कार २०२१चे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी डेव्हिड बोलत होते. कमी शिक्षण घेतले असताना देखील विद्यार्थी, समाज, देश घडविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात उडी घेतली, एसव्हीएस हायस्कूलमध्ये गरजू होतकरू गरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे डेव्हिड म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री डॉ. मदन कोठुळे, अग्रवाल समाज खडकीचे अध्यक्ष दीपक अगरवाल, पत्रकार अमोल सहारे, रविंद्र बाईत उपस्थित होते.

Google Ad

कार्यक्रमामध्ये बोर्डाच्या डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक रियाज शेख, लोकमान्य टिळक हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक प्रवीण इंगोले, खडकी शिक्षण संस्थेचे प्राध्यापक महादेव रोकडे, शिक्षक चंद्रकांत सोनवणे यांना शिक्षक गौरव २०२१ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आज प्रत्येक शिक्षकांनी करोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण कसे मिळेल यासाठी मेहनत घेणे खूप गरजेचे आहे.

शिक्षक हा विद्यार्थ्यांचा पाया असतो आणि तो पाया जर भक्कम झाला तर तो विद्यार्थी पुढील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करतो. शिक्षणातून विद्यार्थी चांगले घडत आहेत अशा शिक्षकांचा सन्मान होणे व त्यांचा गौरव होणे खूप गरजचे आहे असे कोठुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सचिन शिंगोटे, सुवर्णा काळभोर, शार्दूल बाईत, रोहन शिंदे, शिवाजी गवारे, संजय चव्हाण, अक्षय कळसकर, अमित कुलकर्णी, राजेंद्र कांबळे, अभिजित भटवेरा आदी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

19 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!