Google Ad
Editor Choice

संत निरंकारी मिशन तर्फे … जुनी सांगवी येथे रविवारी १२ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ डिसेंबर) : अखिल विश्वात संत निरंकारी मिशन मानव कल्याण कार्यात अग्रेसर आहे . संत निरंकारी मंडळ समाजात अज्ञान, अंधश्रद्धा व अंधविश्वास यांचे समुळ उच्चाटन करून खऱ्या अर्थाने सत्संगाच्या माध्यमातून अध्यात्मिक जनजागृती चे कार्य १९२९ सालापासून आजपर्यंत अव्याहतपणे करत आहे . एवढेच नाही तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण , स्वच्छता अभियान सारखे लोकोपयोगी कार्यही करत आहे .

तसेच संपुर्ण भारतात सर्वात जास्त रक्तदान संत निरंकारी मिशन च्या माध्यमातून होत आहे . संत निरंकारी मंडळाची शाखा जुनी सांगवी येथे गेले ३० वर्षांपासून कार्यरत आहे

Google Ad

या शाखेच्या वतीने जेंव्हा जेंव्हा रक्ताची कमतरता भासते तेव्हा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते व गोरगरिबांसाठी रक्ताची गरज भागवली जाते

संत निरंकारी मंडळ सांगवी सांगवी शाखेच्या वतीने येत्या रविवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा , गजानन महाराज मंदिरासमोर , जुनी सांगवी येथे
रक्तदान शिबिर आयोजित केले आहे .

या महान परोपकारी कार्यात आपण यापूर्वी ही रक्तदान करून योगदान दिले आहे. यावेळेस सुद्धा आपल्या पावन चरणावर आम्ही विनंती करतो की आपण रक्तदान करून मानवकल्यान कार्यात आपले योगदान द्यावें . असे आवाहन संत निरंकारी मंडळ सांगवीच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!