Google Ad
Uncategorized

भाजपचं दुकान जोरात, पण ओरीजीनल गिऱ्हाईकं कुठे दिसत नाहीत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑगस्ट) : भाजपा आता मोठा झालाय, दाही दिशांना विस्तारलाय. भाजपाचे ‘दुकान’ जोरात सुरू आहे. मात्र या दुकानात नवीन ग्राहकच जास्त दिसत आहेत. जुने काही दिसत नाही, असा जबरदस्त टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्याच भाजपला लगावला.

आज राजकारणाचा बाज बदलला आहे, व्याख्या बदलली आहे. आजचे राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण असे स्वरूप झाले आहे, अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली.

Google Ad

बुलढाणा येथे एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते पुढे म्हणाले, जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात काम केले. तेव्हा मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती. तेव्हा हमखास निवडणुका हारल्या जायच्या. त्यावेळी बुलढाणा जिह्यात प्रवाहाच्या विरोधात काम केले. त्यांनी कधी मान सन्मानाची अपेक्षा ठेवली नाही. पक्षासाठी देशासाठी अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान केले.

जेव्हा दुकान चालायला लागते तेव्हा गिऱहाईकांची कमी नसते असे सांगून गडकरी पुढे म्हणाले, आता भाजपचे दुकान चांगले चालू आहे. गिऱहाईकांची कमी नाही आहे, पण ओरीजीनल गिऱहाईके कुठे दिसत नाहीत, असा टोला त्यांनी स्वपक्षाला लगावला. माझ्यासारख्या लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे की आज जे चांगले दिवस आम्हाला पहायला मिळतायत ते जुन्या कार्यकर्त्यांमुळेच. त्यांची जाण ठेवा, असेही त्यांनी पुढे सुनावले.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!