Google Ad
Editor Choice

लेकीचं लग्न असतानाही त्यांनी दिलं आपल्या कामाला आणि जबाबदारीला प्राधान्य … एका कर्तव्यनिष्ठ पोलीस आयुक्त बाबांविषयी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ डिसेंबर) :आज मुंबईत महाविकास आघाडीकडून भाजपविरोधात महामोर्चा काढण्यात आला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीविरोधात भाजपने आज माफी मांगो आंदोलन करण्याची घोषणा केली होती. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज राजकीय पक्षाच्या मोर्चा आणि आंदोलनामुळे राजकीय हायव्होलटेज ड्रामा असे चित्र पाहायला मिळाले. या मोर्चा आणि आंदोलनात कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांकडे होती. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करत मोर्चा आणि आंदोलन कोणतेही गालबोट न लागू देता नीट हातळले.

लेकीसाठी तिचे वडील किती महत्त्वाचे असतात किंवा एखाद्या वडिलांसाठी त्यांची लेक किती महत्त्वाची असते याचा दाखला देण्याची गरज नाही. कारण, या नात्याचा उल्लेख झाला, की त्यासोबतच सर्व गोष्टी आल्या म्हणून समजा. अनेक बापमाणसांसाठी त्यांची लेक सर्वतोपरी महत्त्वाची असते. पण, काहींसाठी त्यांचं काम आणि त्याप्रती असणारी कर्तव्यनिष्ठासुद्धा तितकीच महत्त्वाची असते.

Google Ad

मुंबईचे पोलीस आयुक्त Vivek Phansalkar हे अशाच कर्तव्यनिष्ठ बाबांपैकी एक. लेकीचं लग्न असतानाही त्यांनी कामाला आणि आपल्या जबाबदारीला प्राधान्य दिलं. त्यामुळं खऱ्या अर्थानं या लेकीसाठी फणसळकर पुन्हा एकदा तिचे पहिलेवहिले सुपरहिरो ठरले असं म्हणायला हरकत नाही.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!