Categories: Editor Choice

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी … माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वतीने आनंद बुद्ध विहारात बुद्धवंदना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 एप्रिल 2022) :  चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत आहे. मात्र त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा आणि ते जनसेवेसाठी पुन्हा एकदा सज्ज व्हावे यासाठी मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वतीने रहाटणीतील आनंद बुद्ध विहारामध्ये सामुदायिक बुद्ध वंदना, सुत्त पठण, रतन सुत्त, नेत्ता भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी संघाचे अध्यक्ष महादेव कांबळे सचिव पोपट कदम सखाराम कांबळे यांच्यासह रहाटणी परिसरातील असंख्य बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, मागील काही दिवसांपासून आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा होत आहे. आमदार जगताप यांचे आपल्या विहारावर विशेष प्रेम आहे. म्हणूनच मागील दहा वर्षांपासून बाबासाहेबांची जयंती असो, बुद्ध पौर्णिमा असो किंवा विहारातील कोणताही लहान मोठा समारंभ असो ते स्वतः जातीने हजर रहात असत.

आमच्यासारख्या हजारो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारे आमचे भाऊ हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक योद्धा असून त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा व ते पुन्हा एकदा जनसेवेसाठी सज्ज व्हावेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

6 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

13 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago