Google Ad
Uncategorized

भाऊ, तुमच्यामुळे मी परत आमदार झालो; नवनिर्वाचित भाजप आमदार राम शिंदे यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरी जाऊन मानले आभार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेली विधानपरिषद निवडणूक आणि ज्यांच्यामुळे विधानपरिषदेत भाजपचा विजय सुकर झाला, ज्यांचे माजी मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी भरभरून कौतुक केले ते पिंपरी-चिंचवडचे लढवय्ये नेते व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची नवनिर्वाचित आमदार राम शिंदे यांनी मंगळवारी (दि. २१) रोजी पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन भेट घेतली. “भाऊ, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा आमदार होऊ शकलो. तुमची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती भाजपच नाही तर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारी आहे”, अशा शब्दांत आमदार शिंदे यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे आभार मानले.

तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. पिंपरी-चिंचवडमधील जनतेच्या सेवेसाठी तुम्ही लवकरात लवकर पुन्हा नव्या जोमाने काम सुरू करा. आपल्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकवायचा आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. आमदार जगताप यांनी आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार राम शिंदे यांचे अभिनंदन केले.

Google Ad

यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू, माजी नगरसेवक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!